ज्याप्रमाणे एखादी व्यक्ति एखाद्या झाडावर, फुलावर, फळावर, एखाद्या पक्ष्यावर, प्राण्यावर तसेच एखाद्या दुचाकी/चारचाकी इ. गोष्टींवर माणसांसारखा प्रेम करतो, अर्थातच ती गोष्ट त्याला पुष्कळ आवडत असते. अगदी तसंच सोप्या भाषेत सांगायचं झाल, तर एसटीवर निस्सीम प्रेम करणारा हा ‘एसटीप्रेमी’ म्हणून ओळखला जातो.
लहानपणापासून एसटीबसने केलेला प्रवास, त्या आठवणी, एसटीच्या बसेसविषयी प्रचंड कुतूहलता असणारी प्रत्येक व्यक्ति ही एसटीप्रेमी म्हणून ओळखली जाते.
एसटीच्या एखाद्या नियोजनात सहकार्य करणारे विविध संस्थेचे “एसटीमित्र” तुम्हाला सापडले असतील, पण एसटीप्रेमी ही संकल्पनाच खुप मोठी, वेगळी आणि व्यापक आहे आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या संस्थेचा भाग होणे गरजेचे आहे.
मुळात एसटीची विशेष आवड असणाऱ्या, तसेच तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या उत्साही मंडळींचा हा समूह असल्यामुळे प्राथमिक स्तरावर हा आमचा छंदच !
एसटीच्या बसेसने प्रवास करणे, त्यांच्या नोंदी करून त्या जपून ठेवणे, एसटीच्या निरनिराळ्या बसेसची वैशिष्ट्ये टिपणे, जुनी तिकिटे, पासेस, फोटो इ. चा संग्रह करून तो जतन करणे हा आमच्या छंदाचा महत्वपूर्ण भाग.
पण इतकी वर्ष सदरचा छंद जोपासत असताना आमच्या या अनोख्या गोष्टींचा उपयोग एसटी तसेच प्रवासी वर्गासाठी उपयुक्त ठरावा, या अनुषंगाने एसटीप्रेमी ग्रुपची स्थापना केली आणि एसटीच्या प्रचार आणि प्रसाराचे नानाविध उपक्रम हे एसटीप्रेमींच्या संकल्पनेतून राबवले जाऊ लागले.
एसटीच्या प्रचार आणि प्रसारचे अनेक उपक्रम वर्षभर वर्षभरात राबवले जात असून सदरच्या उपक्रमाला एसटीचे संपूर्ण सहकार्य असते हे विशेष !
सर्व उपक्रम आपल्याला सदरच्या संकेत स्थळावर पहावयास मिळतील.
नाही ! एसटीचा अधिकृत ग्रुप असा दुजोरा देणे योग्य नसून एसटीच्या प्रचार आणि प्रसारासाठी केल्या जाणाऱ्या त्या तमाम बाबींना सर्वोतपरी सहकार्य करण्याचे काम एसटी महामंडळ करते हे विशेष !
एसटीच्या जनजागृतीचे अनेक उपक्रम हे एसटी प्रशासन आणि Bus For Us Foundation च्या संयुक्त विद्यमानाने राबवले जातात.
होय !
एसटीच्या आवडीपोटी सदरच्या संस्थेला संपूर्ण महाराष्ट्रातील एसटीप्रेमी जोडले गेले असून एसटीची एकूण एक माहिती ही गोळा केली जाते आणि ती कर्मचारी तसेच प्रवासी वर्गात योग्य माध्यमातून देऊ केली जाते.
सावंतवाडीपासून ते गोंदियापर्यंत, नंदूरबारपासून ते गडचिरोलीपर्यंत एसटीप्रेमींचे हे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले, असून एसटीच्या एकूण एक माहितीची देवाण घेवाण येथे केली जाते.
संस्थेच्या विविध समाजमाध्यांवर (फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर) जोडले गेल्यास, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील एसटीच्या सर्व घडामोडी आपल्याला एका ठिकाणी मिळू शकतील.
(एसटीबाबतची कोणतीही माहिती, ही एसटीकडून शहनिशा करून तसेच परवानगीन्वयेच Bus For Us Foundation तर्फे पुरवली जाते)
होय !
Bus For Us Foundation मार्फत अनेक उपक्रम वर्षभर राबवले जात असून त्यात अनेक एसटीप्रेमींचा हा उत्स्फूर्त सहभाग असतो.
त्या सर्व उपक्रमांची माहिती आपल्याला सदरच्या संकेत स्थळावर मिळेलच पण त्यातील “वारी एसटीप्रेमींची” आणि “ग्रीन टुरिझम” हे २ कार्यक्रम विखुरलेल्या एसटीप्रेमींच्या खास भेटीचे !
प्रत्येक नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात “वारी एसटीप्रेमींची” हा अनोखा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम असतो, तर पावसाळ्यात साधारण ऑगस्ट/ सप्टेंबर महिन्यात “ग्रीन टुरिझम” नामक पावसाळी सहल असते.
सदरच्या २ कार्यक्रमांची आतुरता एसटीप्रेमीना सतत लागून असते आणि त्यात मोठ्या प्रमाणात एसटीप्रेमी सहभागी देखील होतात.
सध्या तरी आपल्या महाराष्ट्रातील लालपरीवर असणाऱ्या प्रेमामुळे महाराष्ट्रातील अनेक उत्साही मंडळींचा हा समूह तयार झाला असून जे काही उपक्रम होत आहेत, ते फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील एसटीसाठीच केले जात आहेत.
पण असे असताना देखील सदरच्या संस्थेचा मूळ उद्देश तसेच या संस्थेत कार्यरत असणारी व्यक्ति ही महाराष्ट्रातील एसटीसोबतच भारतातील इतर ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची चाहती असल्यामुळे भारतातील सर्व सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवेंचा आदर करते, तसेच तिच्या प्रचार आणि प्रसारासाठी, संवर्धनासाठी, उन्नतीसाठी देखील प्रयत्नशील आहे.
भविष्यात संधी मिळाल्यास आणि Bus For Us Foundation ला एसटीप्रेमींच्या रूपाने आणखीन बळकटी मिळाल्यास, सदर संस्था भारतातील सर्व सार्वजनिक प्रवासी वाहतूक संस्थांसाठी मोठ्या उत्साहाने काम करण्यास सदैव सज्ज असेल.
संस्थेत सहभागी होण्यासाठी आपण स्वतःहून संस्थेच्या कोणत्याही उपक्रमात सहभागी होऊन एसटीच्या प्रचार आणि प्रसारचा अमुल्य असा भाग होऊ शकता. अट फक्त एवढीच की आपण “एसटीप्रेमी” असावे.
महाराष्ट्रात कुठेही, वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमात आपली असणारी उपस्थिती हाच मुख्य सहभाग असून, संस्थेच्या आर्थिक उभारणीसाठी तसेच महत्वपूर्ण कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पेड मेंबरशिप देखील उपलब्ध आहे.
Bus For Us Foundation ची मेंमेबरशीप सध्या फक्त वार्षिक असून त्याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या संकेतस्थळाच्या “सहभागी व्हा” या टॅबमध्ये मिळू शकेल.
नाही !
Bus For Us Foundation संस्था ही मुळात एसटीची विशेष आवड असणाऱ्या उत्साही मंडळींचा समूह असून, एसटीच्या अनेक प्रचार आणि प्रचाराची ही कामे, सहभागी होणारा प्रत्येकजण ‘स्वयंसेवक’ म्हणून करत असतो.
त्यामुळे सदरच्या संस्थेस किंवा संस्थेच्या कोणत्याही सभासदास एसटीच्या कोणत्याही प्रकारचा मोफत पास किंवा प्रवास भाड्यात सवलत मिळत नाही.
(संस्थेच्या कोणत्याही उपक्रमास एसटीबसने येण्यासाठी सभासदास ४ आणि ७ दिवसांचा ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेचा प्रवासी पास महत्वाच्या बस स्थानकात उपलब्ध असतो, सदर पास हा फिरण्याच्या दृष्टीने अगदी माफक दारात उपलब्ध आहे)