एप्रिल 3, 2019
573
0
एसटीप्रेमींच्या या प्रवाहात एसटी सोबत काम करत असताना Bus For Us Foundation द्वारे एसटीला बऱ्याच सुचना दिल्या जातात.
या सुचना मग एखादा मार्ग सुचविण्याबाबत असो, किंवा बसेसच्या बांधणी आणि रंगसंगतीबाबत असो किंवा इतर कोणत्याही सेवेबाबत असो, अश्या एक ना अनेक सुचना आम्ही स्वतः तसेच इतर प्रवाशी वर्गाकडून येणाऱ्या इतर सुचना किंवा अभिप्राय आम्ही एसटीपर्यंत पोहचवून त्यास योग्य तो पाठपुरावा करून, एसटीला तिच्या कारभारात हाथभार लावण्याच्या उद्देशाने सातत्याने प्रयत्न करत असतो.
आमच्या प्रत्येक प्रवासात चालक आणि वाहकाचा त्याच्या कामात प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने यथेच्छ सत्कार करून, त्यांना भेटवस्त सुद्धा देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचे देखील काम Bus For Us Foundation मार्फत केले जाते.
थोडक्यात काय तर एसटीप्रशासन आणि प्रवाशी यांमधील दुवा आहे, तो जोडण्याचे काम आमच्या या Bus For Us Foundation मार्फत केले जात असून, एसटीची जनमानसातील प्रतिमा अधिक उंचावण्याच्या दृष्टीने आमचे हे काम प्रत्येक एसटीप्रेमी निःस्वार्थ वृत्तीने संपूर्ण महाराष्ट्रभर करत असतो.
Add Comment