एप्रिल 10, 2019
624
2
मुळात प्रदर्शन हे असे महत्वपूर्ण माध्यम आहे, की त्यामधून आपण कोणत्याही विषयाला समाजापुढे एका प्रबोधनाच्या माध्यामातून पुढे आणू शकतो, शिवाय मांडलेल्या विषयाच्या इथंभूत माहितीमुळे प्रेक्षक वर्गात कुतुह्लता निर्माण होऊन आणखीन जास्त माहिती घेण्याची जिज्ञासा त्यामध्ये प्रकट होते.
Bus For Us Foundation च्या संकल्पनेतून साकार झालेली एसटीविश्व संकल्पना देखील अशीच निराळी आहे. एसटी आणि त्याच अनुषंगाने सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे महत्त्व हे अनोख्यारित्या पटवून देण्यासाठी प्रदर्शनाचे अनोखे माध्यम स्वीकारून एसटीची जनजागृती करण्याचे आज महत्त्वपूर्ण काम आम्ही यामाध्यमातून करत आहोत. १९४८ म्हणजेच एसटीच्या जन्मापासून ते आजपर्यंतचा संपूर्ण इतिहास हा वेगेवेगळ्या माध्यमातून लोकांना दाखविला जातो, तसेच एसटी नेमकी काय आहे ? तिचे नेमके स्वरूप काय आहे ? तिची गरज नेमकी काय आहे ? या सेवेचे महत्त्व किती मोठे आहे ? का एसटीला बळकटी आणण्याची गरज आहे ? इ. महत्त्वाचे विषय हे एसटीविश्व प्रदर्शनाचा भाग असून त्याद्वारे एसटीची जनजागृती केली जाते.
एसटीविश्व ते एसटीविश्व रथ हा प्रवास देखील आम्हाला खुप महत्वाचा वाटतो.
एका चालत्या बसमध्ये तिच्या आतील भागात विशिष्ट व्यवस्था करून संपूर्ण प्रदर्शन मांडले जाते आणि सदर बस ही बसस्थानकात उभी ठेऊन प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेऊन एसटीचा हा इतिहास मोठ्या प्रमाणावर लोकांसाठी खुला केला जातो, हा प्रयोग अगदीच निराळा आहे.
एसटीचे महत्त्व नेमके किती आणि काय आहे हे अगदी तळागाळातील लोकांना समजण्यासाठी एसटीविश्व रथ नामक प्रदर्शन आता लोकांच्या चक्क दारात जात आहे आणि लोक देखील त्यास भरपूर प्रतिसाद देऊन, या संकल्पनेचे कौतुक देखील करत आहे.
भविष्यात एसटीला सक्षम करणाऱ्या, एसटीला बळकटी आणून तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या नव्या पिढीला सदर प्रदर्शन अधिक प्रमाणात लोकाभिमुख केले जात आहे, याचे आम्हास फार कौतुक वाटते.
शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था इ. घटक आज एसटीची ही संकलित केलेली एकत्रित माहिती घेण्यासाठी एसटीविश्व रथाला भेट देत आहे, शिवाय एसटी या विषयावर प्रोजेक्ट देखील करण्याची तयारी दर्शवत आहे आणि हेच या प्रदर्शनाचे यश आहे असे आम्हास वाटते.
एसटीबद्दल आपुलकी, प्रेम, सद्भावना ही लोकांना काल ही होती, आज ही आहे आणि उद्या देखील असणार आहे, फक्त गरज आहे ती ही सद्भावना त्यांच्या मनातून काढून त्यांच्यासमोर ठेवण्याची आणि हे काम आज एसटीविश्वच्या रूपाने होत आहे, असे सांगण्यास आम्हास आज प्रचंड आनंद होत आहे.
(सोबत छोट्या व्हिडीओ तसेच लोकांचे अभिप्राय जोडणे)
Add Comment