एप्रिल 8, 2019
579
0
दिवाळी, होळी, गणपती तसेच इतर छोट्या – मोठ्या यात्रा काळात एसटी जादा गाड्यांची व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात करत असते.
बस स्थानकात होणाऱ्या अतिरिक्त प्रवासी भारमानामुळे एसटीला तिच्या नियोजनात अतिरिक्त मदत म्हणून आम्ही एसटीप्रेमी ‘प्रवाशी मित्र’ म्हणून एसटीच्या खांद्याला खांदा लाऊन या नियोजनात हाथभार लावत असतो.
जादा गाड्यांचे असणारे नियोजन, गाड्यांचे वेळापत्रक, गाड्या कुठून सुटणार, आरक्षण इ. गोष्टींची इथंभूत माहिती आम्ही स्वतः एसटीचाच एक भाग म्हणून प्रवाश्यांना देऊ करत असतो.
एसटी आपल्या प्रवासी वर्गाला देऊ करत असलेल्या या अफाट सेवेचा आपण देखील एक छोटासा भाग होऊन तसेच, एसटीच्या सेवेबद्दल कृतज्ञ राहून Bus For Us Foundation “ प्रवाशी मित्र कक्ष” या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्रातील विविध बस स्थानकांत सदर उपक्रम निःस्वार्थीपणे राबवत आहे.
Add Comment