एप्रिल 4, 2019
797
0
एसटी हा आम्हा एसटीप्रेमींसोबतच अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय असताना, एसटीच्या बसेसचे अनेक खेळण्यातले मॉडेल (स्केल मॉडेल) आम्ही आमच्या आवडीतून साकारले आहेत.
पेपर, पुठ्ठा तसेच अनेक गोष्टींपासून बनवलेले हे बसेसचे आकर्षक मॉडेल, आम्ही भरवत असलेल्या प्रदर्शनाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून त्या ठिकाणी मांडतो आणि त्यामुळे हेच मॉडेल अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झाले आणि याची मागणी अनेक स्तरातून जोर धरु लागली.
कोणत्याही गावात भरलेल्या जत्रेत साधं ऑटोरिक्षाचे देखील मॉडेल उपलब्ध असताना, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या आपल्या एसटीच्या बसेसचे असे मॉडेल का उपलब्ध नाही, या खंत वाटली आणि यातुन एसटीची अनके मॉडेल Bus For Us Foundation ने आज साकारली आहेत आणि लोकांच्या मागणीनुसार आहे त्याच दरात (कोणताही नफा न पाहता) आम्ही आमच्या आवडीतून हे मॉडेल इतरांना देखील उपलब्ध करून देत आहोत.
एसटीबसेसच्या स्केल मॉडेल शिवाय आम्ही इतर गोष्टी देखील बनविल्या आहेत, की ज्या आपण आपल्या खास आठवणीत संग्रही ठेऊ शकतो किंवा आपल्या स्नेहिंना भेट म्हणून देऊ शकतो.
एसटीच्या फोटोचे छापील मग, पेपर मॉडेल, किचेन, बॅज, दिनदर्शिका, जुन्या तिकिटांचा संग्रह, फोटो फ्रेम अश्या अनेक गोष्टी आम्ही आमच्या आवडीतून आज साकारल्या आहेत आणि विशेष म्हणजे भारतीय रेल्वेनंतर प्रवाशी वाहतूक देणाऱ्या सर्व परिवहन महामंडळापैकी एसटी महामंडळ हे पहिले महामंडळ ठरले की, एसटीच्या प्रचार आणि प्रसारासाठी अश्या प्रकारच्या विशेष भेट वस्तूंची अनोखी संकल्पना Bus For Us Foundation मार्फत राबवत आहे.
विशेष बाब अशी की, दस्तुरखुद्द परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष महोदय यांनी देखील आमच्या अनोख्या संकल्पनेची दखल घेऊन आमचे अभिनंदन करत या, सर्व वस्तू स्वतः जवळ संग्रह म्हणून मोठ्या आपुलकीने ठेऊ केल्या.
Add Comment