एप्रिल 10, 2019
634
2
एसटी असणारी अनोखी आवड, त्या आवडीतून तयार झालेला अनोखा छंद आणि त्या छंदातून निर्माण झालेला हा एसटीप्रेमींचा विशेष समूह.
एसटीवर भरभरून प्रेम करणाऱ्या उत्साही मंडळींचा Bus For Us Foundation हा विशेष समूह असून ही आवड जोपासणारे अनके एसटीप्रेमी या महाराष्ट्रात विखुरले गेले असताना, अश्या तमाम विखुरलेल्या एसटीप्रेमींना एकत्र आणून एसटीबाबत अनेक गोष्टींवर मनमुराद गप्पा मारून, आपले एसटीवर असणारे नितांत प्रेम सर्वांसमवेत व्यक्त करण्याचा अनोखा दिवस म्हणजेच वारी एसटीप्रेमींची !
ज्याप्रमाणे वारकारी मंडळींची वारी निघते, अगदी तसचं एसटीप्रेमींची देखील ही अनोखी वारीच आहे.
दरवर्षी जानेवारी महिन्यातील दुसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होणाऱ्या या कार्यक्रमात सबंध महाराष्ट्रातून अनेक एसटीप्रेमी मोठ्या संख्येने या स्नेहसंमेलनास आवर्जून उपस्थित राहतात आणि एसटीबद्दल चर्चा करून एसटीच्या अनेक जुन्या नव्या आठवणींना उजाळा देतात.
महाराष्ट्रच नाही, तर महाराष्ट्राबाहेर देखील इतर राज्यात स्थायिक असणाऱ्या एसटीप्रेमींची देखील हजेरी या सोहळ्यास आवर्जून असते.
एसटीचे महत्त्व आणि आणि तिचे कार्य हे अगदी जवळून कळावे, तसेच या एकत्रित येण्याने एसटी या सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेच्या वृद्धीसाठी प्रवाशी/ एसटीप्रेमी म्हणून आपला देखील हाथभार कश्या प्रकारे लावता येईल, या दृष्टीकोनातून अनेक चर्चासत्रांचे आयोजन देखील या निमित्ताने करण्यात येते.
दरवर्षी या स्नेहसंमेलनाचे आयोजन आपण वेगवेगळ्या शहरात करत असून, प्रत्येक ठिकाणी असलेल्या एसटीच्या कार्यशाळा/ कार्यालय इ. ठिकाणी भेट देऊन, त्याअनुषंगाने त्या ठिकाणची माहिती घेऊन ती संग्रहीत देखील केली जाते.
पक्षीमित्र, वनमित्र, पोलीसमित्र अश्या विविध संकल्पना राबविल्या गेल्या असताना, एसटीला सदैव सहकार्य करणारी तसेच तिच्या संवर्धनासाठी सतत कार्यरत असणारी “एसटीप्रेमी/ एसटीमित्र” ही संकल्पना आम्ही प्रवासी तसेच कर्मचारी वर्गातून स्नेह-संमेलनाच्या निमित्ताने तयार करत आहोत आणि यामध्ये आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देखील लाभत आहे.
एसटीवेड्यांच्या या अनोख्या संमेलनाचा आपण देखील भाग व्हा आणि एसटीचे विश्व एसटीप्रेमींच्या नजरेतून मनसोक्त पहा
Add Comment