एप्रिल 7, 2019
633
0
हल्ली कुणालाही धकाधकीच्या जीवनापासून थोडा विरंगुळा मिळावा, कामाचे शीण कमी व्हावे, म्हणून त्याची पावले ही आपोआपच फिरण्यासाठी वळतात.
सध्या पर्यटन संकल्पना इतकी व्यापक झाली आहे की, त्याचे अनेक वेगवेगळे स्वरूप आपणास सहज पहावयास मिळतात. फिरण्याच्या जागा, ऑफबीट ठिकाणे, गड किल्ले इ. ठिकाणी लोकांचा वावर आता प्रचंड प्रमाणात वाढला असून, परिणामी तिथे जाणाऱ्या वाहनाची संख्या देखील बेसुमार वाढली आहे.
दुचाकी, चारचाकी यांचा वापर आता सर्रास होत चालला असून पर्यावरणाच्या दृष्टीने काही ठिकाणांना धोका निर्माण झाला आहे आणि त्यामुळेच अजिंठा सारख्या जागतिक वारसा स्थळांना भेटी देण्यासाठी फक्त आणि फक्त एसटी बसेसचा पर्याय शासनाने उपलब्ध करून या जागांच्या संवर्धनासाठी महत्वाचे पाउल गेल्या काही वर्षांपूर्वीच उचलले आहे.
हे झाले फक्त काहीच स्थळांविषयी,पण बाकीच्या इतर स्थळांचे काय.? पर्यटनाच्या नावाखाली त्या त्या ठिकाणी होत असलेली वाहनाची गर्दी, त्यामुळे होणारे प्रदूषण इ. गोष्टी या खूप भयावह आहेत. २/३ सुट्ट्या लागून आल्या की बाहेर फिरायला जाण्याचे ट्रेंड हे सध्या वाढत असून, पर्यटन ही संज्ञा पर्यावरणाला हानिकारक बनू पाहत आहे, अशीच परीस्थिती आज निर्माण होऊ पाहत आहे आणि म्हणूनच ‘ग्रीन टुरिझम’ अंतर्गत पर्यावरणपूरक अश्या अनोख्या पर्यटनाची संकल्पना Bus For Us Foundation ने निर्माण केली आहे.
‘आस पर्यटनाची….साथ एसटीची’ या उक्तीला अनुसरून आपण आपल्या प्रवासाच्या व्यतिरिक्त फिरण्यासाठी देखील एसटीचा वापर करू शकतो हा सामजिक संदेश ‘ग्रीन टुरिझम’ ही संकल्पना देत आहे.
दुचाकी/ चार
Add Comment