ग्रीन टुरीझम

 

 

आपणा सर्वांना ठाऊक असलेल्या पर्यटन या संकल्पनेला एका वेगळ्याप्रकारे छेद देऊन, पर्यावरणपूरक असे अनोखे पर्यटन आम्ही एसटीप्रेमी ‘ग्रीन टुरिझम’ च्या माध्यामतून गेल्या काही वर्षांपासून राबवत आहोत.
आम्ही करत असलेल्या या पर्यटनामधील वेगळेपणच असे, की आमच्या प्रवासात आम्ही करत असलेलो सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेचा वापर.
आम्ही आपल्या नेहमीच्या प्रवासात सातत्याने एसटीच्या बसेसचा वापर तर करतोच, पण कधी कुठे ग्रुपने गड-किल्ले किंवा इतर पर्यटन ठिकाणे पहाव्यास गेलोच, तर तेव्हाही आम्ही एसटीची बस प्रासंगिक करारावर घेऊन, हवे तिथे बिनदिक्कत फिरतो.
खाजगी बस, कार, दुचाकी इ. वाहनांचा वापर टाळून, एकत्र केलेल्या या प्रवासामुळे पर्यटनाचा खरा आनंद तर मिळतोच, पण एसटी सारख्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था वापरून रस्त्यावरील रहदारी कमी करून, इंधन वाचवून प्रदूषण देखील कमी केल्याचे समाधान आम्हास पुष्कळ लाभते.
दरवर्षी ऑगस्ट/ सप्टेंबर महिन्यात, आम्ही सदरच्या सहलीचे आयोजन करत असून, महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागातील अनोख्या अश्या प्रेक्षणीय स्थळांना यानिमित्ताने भेटी देत असतो.
भविष्यात संपूर्ण वर्षभर अश्या प्रकारच्या सहलींचे आयोजन करून पर्यटनात एसटीचे महत्त्व अधोरेखित करण्याचा Bus For Us Foundation चा मानस आहे.

Add Comment