दैनंदिन फेऱ्यांव्यतिरिक्त सणवाराच्या काळात एसटी अनेक जादा फेऱ्या प्रवाश्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करत असते. दिवाळी, होळी, गणपती इ. मोठ्या सणांना तर जादा फेऱ्यांचे हे नियोजन एका वेगळ्या स्वरूपात एसटी करत असून एसटीवर नेहमीच्या नियोजनापेक्षा अतिरिक्त असा प्रचंड ताण पडत असल्यामुळे आम्ही एसटीप्रेमी एसटीला या नियोजनात हाथभार लागावा, तसेच आपल्यासारख्या इतर प्रवाशी वर्गाच्या शंकांचे नियोजन हे लवकर व्हावे या उद्देशाने महत्वाच्या तसेच गर्दीच्या बस स्थानकात ‘प्रवासी मित्र कक्ष’ स्थापन करून एसटीला शक्य तितका हातभार लावण्याचा निस्वार्थ प्रयत्न करत असतो.
बस स्थानकातील निरनिराळ्या प्रवाश्यांचे निरनिराळे प्रश्न सोडवण्यात जे समाधान लाभते ते आम्हा एसटीप्रेमींना इतर कोणत्या गोष्टीतून मिळत नाही.
आरक्षण पाहून प्रवाश्यांची गाडी कधी येणार इथपासून ते गाडी आल्यावर त्यांना गाडीत बसवून देण्यापर्यंतची आम्ही स्वयंसेवक म्हणून मदत करत असून प्रवाश्यांना देखील यानिमित्ताने दिलासा मिळतो. गाडी कधी येणार, कोठे येणार, कोणत्या फलाटाला लागणार अश्या निरनिराळ्या शंकाचे निरसन झालेल्या प्रवाश्यांची थाप जेव्हा आमच्या पाठीवर पडते तेव्हा समाजसेवेच्या या कामाचे फलित झाल्याशिवाय राहत नाही आणि हेच काम ‘प्रवासी मित्र कक्षा’ तर्फे केले जात आहे.
प्रवाश्याने, प्रवाश्याच्या सोयीसाठी किंबहुना त्याच्या मदतीसाठी, शिवाय सुखकर प्रवासासाठी तातपुरत्या स्वरुपात राबवलेला हा ‘प्रवासी मित्र कक्ष’ एसटी आणि प्रवाश्यांमधील नाते अधिक घट्ट करून जातो, हे विशेष !
एप्रिल 6, 2019
540
0
Add Comment