स्वयंसेवक
सध्या स्वयंसेवकांना बऱ्याच सामाजिक संस्थामध्ये काम करण्याची नामी संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना Bus For Us Foundation आपल्याला परिवहन क्षेत्रात काम करण्याची एक अनोखी संधी उपलब्ध करून देत आहे. एसटी आणि त्या अनुषंगाने इतर सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवांना अधिक बळकटी कशी आणता येईल, त्या दृष्टीने अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते आणि त्या सर्व उपक्रमास स्वतः एसटीचा पाठींबा असतो हे विशेष !
एसटीविश्व, प्रवासीमित्र कक्ष, ऑटो एक्स्पो आणि याप्रकारच्या अनेक उपक्रमांत आपल्याला स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा असल्यास, आपल्याबद्दलची अधिक माहिती आपण आम्हास खालील ठिकाणी पाठवून द्यावी, जेणेकरून आम्ही आमच्या उपक्रमांची अधिक माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहचवत जाऊ.
प्रायोजक
Bus For Us Foundation मार्फत एसटीच्या प्रचार आणि प्रसाराचे अनेक उपक्रम राबवले जात असताना, गेल्या काही वर्षात या सर्व उपक्रमांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता अनेक उपक्रम हे मोठ्या प्रमाणावर करण्याची नितांत गरज भासत आहे. एसटी या सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या मुळात सामाजिक संस्थाच कमी असल्यामुळे Bus For Us Foundation मार्फत राबवले जाणारे उपक्रम हे किती महत्वाचे आहे, याची प्रचीती आपल्याला येते.
संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना भारतात लोकप्रिय झालेला ‘एसटीविश्व रथा’ नामक प्रबोधन करणारे प्रदर्शन, ऑटो एक्स्पोतील एसटीचा सहभाग, ग्रीन टुरिझम इ. गोष्टींची व्याप्ती वाढल्यामुळे सदर उपक्रम आम्हाला आता मोठ्या प्रमाणात करण्याची गरज भासू लागल्यामुळे आमच्या या आणि भविष्यातील यांसारख्या अनेक उपक्रमांचे आर्थिक हाणीत जुळविण्यासाठी प्रायोजकांना आमचे दार उघडे ठेवले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर राबवल्या जाणाऱ्या आमच्या या उपक्रमांचा विषय महत्त्वपूर्ण तसेच सामाजिक असून, पर्यावरणाच्या दृष्टीने जागतिक पातळीवर दखल घ्यावी असाच आहे.
अधिक माहितीसाठी प्रायोजकांनी खालील नंबरवर संपर्क साधावा.
सभासद
Bus For Us Foundation ही एक Non Profit/ Government Organisation असून यासंस्थेद्वारे केलेल्या कोणत्याही उपक्रमातून नफ्याचा विचार केला जात नाही. एसटी आणि त्या अनुषंगाने सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवांच्या सक्षमीकरणासाठी उभी केलेली ही लोकचळवळ असून लोकांना एसटीचे महत्त्व पटवून देऊन, या सेवेचा प्रचार आणि प्रसार करणे हा एकमेव उद्देश बाळगून काम करणारी ही सेवाभावी संस्था आहे.
अनेक पातळ्यांवर काम करत असताना, कोणत्याही उपक्रमांसाठी आर्थिक बाबींची पूर्तता करावी लागत असल्यामुळे, ही पोकळी भरून काढण्यासाठी Bus For Us Foundation मध्ये सभासद नोंदणीची खास व्यवस्था असून, अगदी माफक दारात आपण Bus For Us Foundation चे सदस्यत्व स्वीकारू शकता.
सभासदांसाठी नोंदणी ही सध्या फक्त वार्षिक असून, भविष्यात त्रैवार्षिक तसेच कायमस्वरूपी सभासद नोंदणी देखील करण्याचा आमचा मानस आहे.
१०००/- (एक हजार मात्र) वार्षिक नोंदणी शुल्क भरून, खालील नियमांन्वये Bus For Us Foundation चे सभासदत्व दिले जाते.
आमच्यासोबत काम करा
Bus For Us Foundation हे सार्वजनिक प्रवासी वाहतूक क्षेत्राच्या प्रचार आणि प्रसारासाठी काम करणारे असे एक प्रभावी माध्यम आहे, की इथे कल्पकतेला मरण नाही,
त्यामुळे आपल्याकडे देखील याविषयक काही भन्नाट आयडिया असतील आणि आपल्याला देखील आमच्यासोबत काम करावयची इच्छा असेल, तर आम्हाला खालील इमेल द्वारे संपर्क करा आणि तुमचा बायोडाटा mail.busforus.in वर पाठवा.
आपण सुचविलेल्या विषयावर काम करण्याची संधी उपब्ध झाल्यास आम्ही आपल्यास नक्कीच संपर्क साधू.