- वार्षिक सभासद नोंदणी शुल्क हे १०००/- प्रती व्यक्ति प्रतीवर्ष असेल.
- वार्षिक सभासदत्व हे ज्या तारखेला आपण शुल्क भरले, त्या तारखेपासून एका वर्षापर्यंत असेल (३६५ दिवस)
- एकदा भरलेले शुल्क हे कोणत्याही कारणास्तव पुन्हा दिले जाणार नाही.
- नोंदणी केलेल्या सभासदास Bus For Us Foundation चे एक छापील टी-शर्ट आणि एक बॅज दिला जाणार असून, त्याचे वेगळे शुल्क आपल्याकडून घेतले जाणार नाही.
- तसेच नोंदणी केलेल्या सभासदास Bus For Us Foundation चे छापील स्वयंसेवकाचे आयडी दिले जाणार असून संस्थेच्या कोणत्याही उपक्रमासाठी (उदा. प्रवासी मित्र कक्ष/ एसटीविश्व इ.) येताना आयडी सोबत आणणे बंधनकारक आहे.
- आयडीचा वापर हा फक्त आणि फक्त Bus For Us Foundation च्याच उपक्रमांना करावयचा असून, इतर ठिकाणी याचा गैरवापर केलेला आढळून आल्यास त्याचे सभासदत्व तात्काळ रद्द करून सदर व्यक्ति ही कायमची ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येतील. (Bus For Us Foundation च्या कोणत्याही उपक्रमात सदर व्यक्तीला सहभागी होता येणार नाही).
- Bus For Us Foundation चे सभासदत्त्व घेतलेली प्रत्येक व्यक्ति ही एसटीचा आरसा म्हणून जनमानसात काम करत असल्यामुळे, एसटीने आखलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. आणि तसे न झाल्यास उल्लंघन केलेल्या व्यक्तीचे सभासदत्व तत्काळ रद्द केले जाईल)
- Bus For Us Foundationचे सभासदत्त्व घेतलेल्या व्यक्तीला संस्थेच्या अनेक उपक्रमांत (उदा. स्नेह संमेलन, ग्रीन टुरिझम इ.) काढणाऱ्या जाणाऱ्या वर्गणीममध्ये १०% सुट दिली जाणार असून, सदर सवलत ही वर्षभरात संस्थेमार्फत राबविणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमांसाठी लागू राहणार आहे.
- Bus For Us Foundation चे सभासदत्त्व घेतलेल्या व्यक्तीला, संस्थेमार्फत विक्रीस उपलब्ध केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या खरेदीमध्ये १०% सवलत देण्यात येणार असून यामध्ये एसटीबसेसचे शोचे मॉडेल, खेळण्यातले मॉडेल, पेपर मॉडेल, छापील मग/किचेन/टी-शर्ट इ. गोष्टींचा समावेश आहे.
(टीप : सदर सवलत ही १००/- किंवा त्याहीपेक्षा जास्त रकमेच्या खरेदीवरच अनुदेय राहील) - Bus For Us Foundation चे सभासदत्त्व घेतलेल्या व्यक्तीला संस्थेच्या कोणत्याही उपक्रमांत सहभागी राहण्याचे सक्ती नसून, स्वयंसेवक या नात्याने तो कधीही, कोणत्याही उपक्रमांना हजेरी लाऊ शकतो.
- ‘वार्षिक स्नेह संमेलन आणि ग्रीन टुरिझम’ Bus For Us Foundation चे हे २ उपक्रम सर्वात महत्वाचे उपक्रम असून, सभासदत्त्व घेतलेल्यांना आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती या ठिकाणी आम्ही करत आहोत, जेणेकरून वर्षातील २ दिवस विखुरलेल्या एसटीप्रेमींना या निमित्ताने एकत्ररित्या भेटता येते आणि चार्चासत्राने एसटीप्रेमाचा खरा आनंद लुटतात येतो